Neelam Gorhe On Pre-Primary School
ESakal
मुंबई
Neelam Gorhe: धक्कादायक! प्री प्रायमरी शाळा गुमास्ता लायसनवर, सरकारी नियंत्रण नाही; उपसभापती गोऱ्हेंची माहिती
Badlapur Crime Case: बदलापूरातील अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच प्री प्रायमरी शाळांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बदलापूर : शहरातील अत्याचाराच्या घटनेनंतर प्री-प्रायमरी शाळांच्या कार्यपद्धतीवर आणि नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी प्री-प्रायमरी शाळा शासनाच्या कोणत्याच विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याची धक्कादायक माहिती गोऱ्हे यांनीच समोर आणली आहे.
