esakal | नेरळ आंबेवाडीमधील विवाहितेची राहात्या घरी गळफास फास लावून आत्महत्या | Suicide
sakal

बोलून बातमी शोधा

 Woman Suicide

नेरळ आंबेवाडीमधील विवाहितेची राहात्या घरी गळफास फास लावून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ (neral) ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडी (ambewadi) आदिवासी वाडीतील (tribal area) प्रमिला दरवाडा (३४) (pramila darwada) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. आजारपणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते. तिला दोन मुले आहेत.

हेही वाचा: Mumbai : ‘एनसीबी’ने त्या तिघांना का सोडले?

प्रमिला हिचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने आणि आजारपणात मोठा खर्च होत असल्याने त्यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होता. त्यामुळे प्रमिला या माहेरी उपचार घेत होत्या. अखेर त्यांनी आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

loading image
go to top