Mahad : महाडमध्ये ६८ मोबाईल टॉवर्सवर कारवाई,१८ लाख १२ हजारांचा दंड सरकारी तिजोरीत जमा

महाड तालुक्यामध्ये मोबाईल टॉवरचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून अनेक ठिकाणी अनधिकृत टॉवर उभे आहेत. ग्रामीण भागामध्ये मोबाईलचे नेटवर्क देण्यासाठी बहुसंख्य मोबाईल कंपन्यांनी या भागामध्ये आपले टॉवर उभे केले आहेत.
network mobile towers
network mobile towerssakal
Updated on

Mahad - महाड अनधिकृत बिनशेती जमीन वापर करून मोबाईल टॉवर उभारणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर महाड महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली असून ६८ मोबाईल टॉवर्सवर दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी ३६ मोबाईल टॉवरची दंडात्मक रक्कम कंपन्यांनी सरकारी तिजोरीत भरली आहे.

महाड तालुक्यामध्ये मोबाईल टॉवरचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून अनेक ठिकाणी अनधिकृत टॉवर उभे आहेत. ग्रामीण भागामध्ये मोबाईलचे नेटवर्क देण्यासाठी बहुसंख्य मोबाईल कंपन्यांनी या भागामध्ये आपले टॉवर उभे केले आहेत.

गावातील मोकळ्या जागेत अथवा शेतातही टॉवर उभे आहेत. वाणिज्य वापरासाठी कंपन्यांनी अनधिकृतपणे बिनशेती जमिनीचा वापर करत टॉवर उभे केले आहेत. अनेक ठिकाणी कंपन्या भाड्याने जागा घेत असल्याने जमिनीचा वापर अनधिकृतरीत्या सुरूच असतो.

यावर नियत्रंण मिळवण्यासाठी तालुक्‍यात विनापरवानगी तसेच ना-हरकत दाखला घेता माेबाइल टाॅवर उभारल्यास आकारण्यात येणारी दंडाच्या रकमेतही आधीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे.

महाड तालुक्यामध्ये एकूण ७१ मोबाईल टॉवर असून यापैकी तीन टॉवर्स सद्यस्थितीत बंद आहेत, उर्वरित ६८ टॉवर्सला महाड महसूल विभागाने प्रत्येकी ४८ हजार रुपये दंड ठोठावला आहे. यापैकी ३६ टॉवर्सचे १८ लाख १२ हजार ५८० रुपयाचा दंड सरकारी तिजोरीत जमा केला आहे. उर्वरित ३२ टॉवर्सची वसुली करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू असल्याचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले.

टॉवरमधील लहरी घातक

मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणांमुळे मानवी शरीरावर परिणाम होतो. मोबाईल ध्वनिलहरींच्या अधिक संपर्कात आल्यास सतत डोकेदुखी, चिडचिडेपणा, थकवा, नैराश्‍य, दृष्टी कमी होणे, कर्करोग यांसारखे आजार बळावू शकतात. याशिवाय लहान मुलांमध्ये विक्षिप्तपणा येऊ शकतो. हे परिणाम शरीरावर तत्‍काळ दिसत नसले, तरी मानसिक-शारीरिक स्‍वास्थ्यावर हळूहळू परिणाम जाणवतात. मोबाईल टॉवर असलेल्‍या परिसरात पशू-पक्ष्यांचा संचारही कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.