धारावीत आज 'इतके' नवे रुग्ण; दादर-माहीम मधील रुग्णवाढ नियंत्रणात

dharavi
dharavi

मुंबई: सर्वात दाट लोकवस्ती असणाऱ्या धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना बघायला मिळत आहे. दाट लोकवस्ती आणि सार्वजनिक शौचालयं यामुळे इथल्या लोकांना कोरोनाची लागण होत होती. मात्र आता इथल्या कोरोना वाढीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आल्याची चिन्हं दिसत आहेत.  

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ 12 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 1924 वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली आहे. 

आज धारावीत 12 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 1924 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 71 वरच रोखण्यात यश आले आहे. माहीम मध्ये आज 14 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 651तकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 9 इतका आहे.

दादर मध्ये आज 12 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही 420 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 12 मृत्यू झाले आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसते.

जी उत्तर विभागात आज दिवसभरात 38 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 2995 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 90 इतका आहे.

new 12 corona patients in dharavi but situation is under control 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com