मुंबईत आज कोरोनाचे 'इतके' नवे रुग्ण; जाणून घ्या आजची आकडेवारी.. 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मुंबईत आज 1247 नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 76,294 झाली आहे. तर 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4461 वर पोचला आहे. 

मुंबई : मुंबईत आज 1247 नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 76,294 झाली आहे. तर 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4461 वर पोचला आहे. 

हेही वाचा: बापरे! मुंबई विभागात तब्बल 'इतक्या' एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा; वाचा सविस्तर बातमी..

मृतांपैकी 21 रुग्णांचा मृत्यू 48 तासात झाला असून 71 मृत्यू अगोदरच आहेत. मात्र मुंबईत आज एका दिवसात 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 
                                                                    
मुंबईत आज नोंद झालेल्या 92 मृत्यूंपैकी 54 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 55 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 15 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 48 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 29 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.           

हेही वाचा: मुंबईकरांनो आता 'इथेही' मास्क वापरणं बंधनकारक; नाहीतर १ हजाराचा दंड..                

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 763 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 52,735 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 891 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  43,545 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

new 1247 corona cases in mumbai today                


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1247 corona cases in mumbai today