धक्कादायक! मुंबईत मृतांचा आकडा 4 हजार पार; आज दिवसभरात 'इतके' नवे रुग्ण.

corona
corona

मुंबई : मुंबईत आज ही बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली असून आज 1365 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 70,990 झाली आहे. तर 98 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4060 वर पोचला आहे. मृतांपैकी 58 रुग्णांचा मृत्यू 48 तासात झाला असून 40 मृत्यू अगोदरच आहेत. मात्र मुंबईत आज एका दिवसात 2141 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत आज नोंद झालेल्या 98 मृत्यूंपैकी 69 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 62 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 7 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 51 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 40 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.            

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 790 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 49,488 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 2141 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  49,488 रुग्णांना घरी सोडण्यात आले.                                                                 

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 55 टक्के इतका आहे. तर 24 जून पर्यंत एकूूूण 3,04,690 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 18 जून ते 24 जून दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.72 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 41 दिवसांवर गेला आहे.     

मुंबईतील 25,78,623 घरांना संनिरीक्षणा दरम्यान भेटी देण्यात आल्या आहेत. तर 4,36,200 ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्यात करण्यात आल्या आहेत. मुंबईत 756 सक्रिय कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 6005 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 6571 अति जोखमीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून सीसीसी 1 मध्ये 16,978 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. तर संस्थेमध्ये 1,29,288 लोकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.
new 1365 corona patients in mumbai today 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com