नवी कोरी बीएमडब्ल्यू भररस्त्यात जळून खाक...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

शोरूममधून ट्रायलसाठी बाहेर काढण्यात आलेल्या नव्या कोऱ्या बीएमडब्ल्यू कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. 25) सकाळी सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी बेलापूरच्या खिंडीत घडली.

नवी मुंबई : शोरूममधून ट्रायलसाठी बाहेर काढण्यात आलेल्या नव्या कोऱ्या बीएमडब्ल्यू कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. 25) सकाळी सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी बेलापूरच्या खिंडीत घडली. कार चालवणाऱ्या मॅकेनिकने वेळीच कारमधून बाहेर पळ काढल्याने तो बचावला. घटनेनंतर त्वरितच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत 15 मिनिटांत आग आटोक्‍यात आणली. 

ही बातमी वाचली का? ...अन्‌ कोरोना शोधण्यासाठी अधिकारी घरोघरी!

नेरूळच्या शिरवणे भागात बीएमडब्ल्यू कारचे इन्फिनिटी हे शोरूम आहे. या शोरूममधील एका मॅकेनिकने मंगळवारी सकाळी शोरूममधील नवी कोरी बीएमडब्ल्यू कार ट्रायलसाठी बाहेर काढली होती. या वेळी मॅकेनिक सदर कार घेऊन सायन-पनवेल मार्गावरून ट्रायलसाठी पनवेलच्या दिशेन जात होता.

ही बातमी वाचली का? सुसज्ज मीनाताई ठाकरे रुग्णालयात डॉक्‍टरच नाही!

या वेळी उरण फाटा येथील उड्डाणपुलावरून गाडी बेलापूर खिंडीत आली असताना, अचानक कारमधून धूर येऊ लागला. त्यामुळे मॅकेनिकने कार रस्त्याच्या बाजूला उभी करत बाहेर धाव घेतली. त्यानंतर अचानक कारने पेट घेतला. सीबीडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले, तरी नेमके कारण शोधण्यासाठी वाहतूक विभागाकडून कारची तपासणी केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new Corvette BMW car burns down navi mumbai