मुंबई- नवी दिल्ली रेल्वे प्रवास होणार सुखकर, पश्चिम रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद

कुलदिप घायवट
Thursday, 4 February 2021

पश्चिम रेल्वे मार्गावरील नवी दिल्ली ते मुंबई प्रवास वेगात होण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. नवी दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसचा वेग 200 किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई:  पश्चिम रेल्वे मार्गावरील नवी दिल्ली ते मुंबई प्रवास वेगात होण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसचा वेग 200 किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यानचा प्रवास 12 तासांवर आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासह अंधेरी-विरार 15 डबा लोकल थांब्यासाठी फलाटांचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी 1 हजार 340 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गासाठी 7 हजार 288 कोटींची तरतूद केली आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गिका, दुहेरीकरणासाठी 833 कोटींची तरतूद, फलाटांची उंची, अतिरिक्त पीट मार्गिका, एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आणि यार्ड नुतनीकरणासाठी विशेष तरतूद केली आहे. रोड ओव्हर ब्रिजसाठी 662 कोटी रुपयांची तरतूद , बोगदा, पुलाचे काम, रेल्वे मार्गाचे नूतनीकरणासाठी 870 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासी सुविधेसाठी 261 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणा आणि इतर इलेक्ट्रिक कामे पूर्ण करण्यासाठी 291 कोटींची तरतूद केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमची संख्या वाढविण्यासाठी 17.17 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 377 एटीव्हीएम बदलून त्याठिकाणी अत्याधुनिक नविन एटीव्हीएम बसविण्यात येणार आहेत. यासाठी 2.50  कोटी रुपयांची तरतूगद करण्यात आली आहे. सिग्नल आणि टेलीकॉमकरिता 44 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील कारखान्याचे नूतनीकरणासाठी 31.6 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मुंबईकरांच्या पाण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय, समुद्राचे पाणी करणार गोडे 

  • पादचारी पुलांसाठी 20.28 कोटींची तरतूद 
  • एकात्मिक सुरक्षा प्रणाली 32 रेल्वे स्थानकांवर राबविण्याकरिता 8.5 कोटींची तरतूद 
  • वांद्रे स्थानकाचा ऐतिहासिक दर्जा संवर्धनाकरिता 5 कोटींची तरतूद 
  • चर्नी रोड-ग्रॅण्ड रोड दरम्यान, प्रभादेवी, विरार-वैतरणा दरम्यानचा, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर, लोअर परेल-एल्फिन्स्टन, वैतरणा, पालघर येथील  रोड ओव्हर ब्रीजचे काम करण्यासाठी 12 कोटी 19 लाखांची तरतूद केली आहे.
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी 7 हजार 897 कोटी रुपयांची तरतूद

-------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

New Delhi and Mumbai speeding Large provision Western Railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Delhi and Mumbai speeding Large provision Western Railway