esakal | आरपीएफ विभागाच्या ताफ्यात नवीन ड्रोन I RPF Drone
sakal

बोलून बातमी शोधा

drone

आरपीएफ विभागाच्या ताफ्यात नवीन ड्रोन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हेही वाचा: मुंबई : कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज केंद्रातील निर्मितीत घट

मुंबई - पश्चिम रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित इन्फ्रारेड इंट्रूडर अलार्म सिस्टम सुरू केली आहे. तर, नवीन ड्रोन रेल्वे सुरक्षा बलाच्या ताफ्यात दाखल केले आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी महालक्ष्मी येथील आरपीएफ शस्त्रागारमध्ये इन्फ्रारेड इंट्रूडर अलार्म सिस्टमचे उद्घाटन केले. तर, महालक्ष्मी येथील रेलवे स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये ड्रोनने पहिली उड्डाण घेतली. या दोन्ही यंत्रणेमुळे पश्चिम रेल्वेच्या विविध भागात करडी नजर ठेवता येणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) आधारित इंट्रूडर अलार्म सिस्टम इंफ्रा-रेड आधारित सीसीटीवी कैमरासह काम करतो. यामुळे 360 डिग्री कव्हरेज घेता येणे शक्य होते. एआई आधारित यूजर इंटरफेस सॉफ्टवेअरच्या मदतीने फक्त प्रवाशांना केंद्रीत केले जाते. चुकीच्या धोक्याच्या अलार्मपासून वाचण्यासाठी एआईद्वारे पक्षी, प्राण्यांना केंद्रित केले जात नाही. आपत्तकालीन समयी या यंत्रणेद्वारे कर्मचाऱ्यांना संकट कॉल, एसएमएसद्वारे त्वरित सूचित केले जाते. यासह रात्रीच्यावेळी ही या सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण दृश्य टिपले जाते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी, गर्दीचे विभाजन करण्यासाठी, आपत्तीच्या भागात नजर ठेवून मदत कार्य पुरविण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. हा ड्रोन सुरक्षितरित्या उडविण्यासाठी आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा ड्रोन जमीन पातळीहून 200 मीटर उंच आणि 2 किमी दूर जाऊ शकतो. आकाशात 25 मिनिटे उडण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

loading image
go to top