खड्डे मुक्त रस्त्यांसाठी नवा प्रयोग, मुख्य रस्त्यावर भूमिगत सुविधांसाठी डक्ट

खड्डे मुक्त रस्त्यांसाठी नवा प्रयोग, मुख्य रस्त्यावर भूमिगत सुविधांसाठी डक्ट

मुंबई: नव्या भूमिगत वाहिन्या टाकण्याबरोबरच त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार होणाऱ्या खोदाकाम भविष्यात बंद होणार आहे. महानगर पालिकेने नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर उपयोगिता वाहिनी (डक्ट)तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रस्त्यांची दुरुस्ती करताना डक्ट तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रस्त्यांची दुरुस्ती करण्यापूर्वी संबंधित रस्त्यावरुन रोज वाहतूक असलेल्या वाहनांची मोजणी करुन रस्त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

मुंबईच्या रस्त्याखालून जलवाहिन्या, पर्जन्यवाहिन्या, मलवाहिन्या, वीजवाहिन्या, टेलिफोन वाहिन्या, फायबर ऑप्टीक्स तसेच इतर प्रकारच्या वाहिन्या जातात. या वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी अथवा नवीन वाहिन्या टाकण्यासाठी दरवर्षी 440 किलोमीटरचे खोदकाम होते. यामुळे रस्त्यांचे नुकसान होते. त्याच बरोबर रस्ता हमी कालावधीत असल्यास खोदकाम झाल्यानंतर हा हमीकालावधीही संपुष्टात येतो. त्यामुळे अशा रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला खर्च करावा लागतो. हे वारंवार होणारे खोदकाम टाळण्यासाठी तसेच रस्त्यांची मजबूती टिकवून ठेवण्यासाठी महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

रस्त्याखालील भूमिगत वाहिन्यांचे जीपीएस लोकेशन निश्‍चित करणे, त्यांचे जीपीएस मॅपिंग करणे, डक्टचा आराखडा तयार करणे याचबरोबर रस्ता दुरुस्त करण्यापूर्वी वाहतुकीची आढावा घेण्यासाठी रस्त्यावरील वाहानांची गणना करुन त्यानुसार रस्त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी महानगर पालिका सल्लागारांची नियुक्ती करणार आहे. स्तूप कंसल्टंट आणि पेंटॅकल कंसल्टंट या दोन सल्लागारांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करणार आहे. संबंधित रस्त्यांवरील विविध बाबींचा अभ्यास करुन आराखडा तयार करुन निवीदा तयार करणे तसेच प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीचीही मंजूरी मिळाली आहे.

 
पहिल्या टप्प्यात 68 रस्त्यांवर डक्ट

पहिल्या टप्प्यात महापालिका मुंबईतील 68 रस्त्यांवर डक्ट तयार करणार आहे. यात,पश्‍चिम उपनगरातील 28, पूर्व उपनगरातील 27 आणि शहर भागातील 13 रस्त्यांचा समावेश आहे.

महानगर पालिकेचे काही रस्ते, रस्त्याचे काही भाग वारंवार खराब होत असतात. त्या बाबतही या सल्लागारांना अभ्यास करावा लागणार आहे. रस्ते खराब होण्याच्या कारणांचा अभ्यास करुन त्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी या सल्लागारांवर आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

New experiment for pothole free roads ducts for underground facilities on main roads

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com