तेजस ठाकरे आणि टीमने शोधली पालींची नवीन प्रजाती, नाव आहे...

तेजस ठाकरे आणि टीमने शोधली पालींची नवीन प्रजाती, नाव आहे...

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि त्यांच्या टीमने एक नवीन शोध लावलाय. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि त्यांच्या टीमने पालींची दुर्मिळ प्रजाती शोधून काढलीये. 

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने शोधून काढलेल्या या पालींची विशेषता म्हणजे त्यांचा रंग, गोलाकार डोळे, मोठे बुबुळ आणि विशेष शरीररचना. महाराष्ट्रात पालींच्या ५० विविध प्रजाती आढळतात. ही प्रजाती आधीच्या ५० प्रजातींपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच प्राणी निरीक्षक आणि तज्ज्ञांचं ही नवीन प्रजाती आता अधिक लक्ष वेधून घेतेय. तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांच्या टीमने शोधून काढलेल्या या प्रजातींमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत आणखी भर पडली आहे. 

अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे , सौनक पाल आणि ईशान अगरवाल यांनी ही पालींची दुर्मिळ प्रजाती शोधून काढलीये. (Magnificent Dwarf Gecko) मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको असं या पालीचं नामकरण करण्यात आलंय. या पालींची विशेषतः म्हणजे या पाली रात्री ऍक्टिव्ह होतात. इतर नर पालींच्या मांडीवर असणारे खवले या पालींवर पाहायला मिळत नाही. त्याचसोबत इतर पालींच्या मांडीवर असलेल्या ग्रंथींपेक्षा या पालींच्या ग्रंथी या वेगळ्या प्रकाच्या आहेत. म्हणून या पालींना बारकाईने निरीक्षण केलं तरंच त्या ओळखू येतात. या पालींची लांबीही ही साधारणतः ५८ मिलीमीटर इतकी असते. 

खरंतर कर्नाटकच्या सकलेशपूर जंगलात 2014 मध्येच मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको या पालींच्या प्रजाती आढळल्या होत्या. मात्र या आधी आढळणाऱ्या पालींच्या प्रजातींपैकी या पाली वेगळ्या कशा आहेत हे सिद्ध कारणं खूप कठीण होतं. याशिवाय इतर पन्नास प्रजातींच्या नोंदी उपलब्ध नसल्याने याआधीच्या ५० पालींचे नमुने  गोळा करणे आणि या पालीचे वेगळेपण सिद्ध कारणं अधिक आव्हानात्मक असल्याचं शोधकर्त्यानी सांगितलं आहे. 
New gecko species discovered in Western Ghats by tejas thackeray akshay khandekar and team

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com