esakal | घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...
sakal

बोलून बातमी शोधा

घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...

आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. पण आम्ही डॉक्टरला अजून अटक केलेली नाही. डॉक्टर रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयातून त्याला होम क्वारंटाईन केल आहे.

घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - एकिकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या गडद छायेत असताना मुंबईत 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत अश्लीश कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

वोकहार्ट रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरने कोरोनाग्रस्त रुग्णासोबतच अश्लील वर्तन केल्याची ही घटना घडली असल्यामूळे यावर संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, आरोपी डॉक्टरला कामावरून काढून टाकण्यात आले असून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही कारण, हा डॉक्टर रुग्णाच्या क्लोझ कॉन्टॅक्टमध्ये आल्याने त्यालासुद्धा कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सावधान ! सारखा सारखा अकाउंट बॅलन्स चेक कराल तर बसेल फटका...

डॉक्टरवर गुन्हा दाखल -

सध्या आरोपी डॉक्टर क्वारंटईन असून त्याच्यावर आयपीसी अंतर्गत कलम 377 आणि 269 विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

30 एप्रिल रोजी या डॉक्टरची रुग्णालयात नेमणूक झाली होती आणि कामाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा गंभीर गुन्हा केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असुन सध्या त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. 

1 मे या दिवशी सकाळी 9.30 च्या सुमारास 10 व्या मजल्यावर असणार्या ICU मध्ये असलेल्या एका कोरोना रुग्णासोबत डॉक्टरने गैरव्यवहार केला. 30 एप्रिल या दिवशी या डॉक्टरची वोकाहार्ट रूग्णालयात नेमणूक झाली होती. त्याच्या दुसर्या दिवशीच डॉक्टरने हा प्रकार केल्याचं उघड झाल. त्यानंतर या प्रकाराबाबत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करण्यात आली. शिवाय, रुग्णालय प्रशासनाकडून पालिका आणि पोलिस स्थानकात ही तक्रार नोंद केली आहे. 

'हॅप्पी हायपोक्सिया' ! कोरोना रुग्णांमध्ये आढळून येतायेत 'ही' जीवघेणी लक्षणं, वाढतोय मृत्यूचा धोका

आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. पण आम्ही डॉक्टरला अजून अटक केलेली नाही. डॉक्टर रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयातून त्याला होम क्वारंटाईन केल आहे. - सावळाराम आगवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आग्रिपाडा पोलिस स्थानक

new joiney doctor did inappropriate thing with covid patient read full story

loading image