सावधान ! सारखा सारखा अकाउंट बॅलन्स चेक कराल तर बसेल फटका...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

सध्याच्या डिजिटल युगात बँकही आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाली आहे. दुसऱ्यांना पैसे पाठवण्यापासून तर स्वतःच्या खात्यात असणारी रक्कम तपासण्यापर्यंत आपण सर्व काही क्षणात करू शकतो.

मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात बँकही आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाली आहे. दुसऱ्यांना पैसे पाठवण्यापासून तर स्वतःच्या खात्यात असणारी रक्कम तपासण्यापर्यंत आपण सर्व काही क्षणात करू शकतो. काही लोकांना तर आपल्या खात्यात असणारी रक्कम वारंवार तपासण्याची सवय असते. मात्र आता ही सवय तुम्हाला महागात पडणार आहे. कारण आता बँक खात्यात असलेली रक्कम तपासण्यामागे शुल्क आकारण्यात येणार आहे

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र आणि म्हटलं...

या लॉकडाऊनच्या दिवसात बँक खात्यातली रक्कम तपासण्याचं प्रमाण वाढल्यामुळे डिजिटल सिस्टम फेल होत आहेत अशी माहिती बँक आणि काही पेमेंट ऑपरेटर्स यांनी दिली आहे. त्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) नं नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडे बँक खात्यातली रक्कम तपासणाऱ्या ग्राहकांकडून ५ रूपये शूल्क आकारण्यात यावं असं सुचवलं आहे. मात्र सरकार किंवा आरबीआय या सूचनेचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.

लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या जनतेसाठी सरकार निरनिराळ्या योजना राबवत आहे आणि त्यांना आर्थिक मदत पोहोचवत आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जातायेत. त्यामुळे साहजिकच बँक खात्यातली रक्कम तपासण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे बँक आणि पेमेंट ऑपरेटर्स यांची डिजिटल सिस्टम फेल होतेय. 

राज्यात मद्यविक्रीस परवानगी; मात्र, "हे" नियम असतील बंधनकारक!

परिणामी याचा त्रास ग्राहकांनाच होतोय. काही जणांचे बँकेचे व्यवहार होत नाहीयेत. तर काही जणांची रक्कम बँक खात्यातून कापली जातेय. या सर्व गोष्टींचा अतिरिक्त ताण बँकांवर येत आहे. त्यामुळे बँकांवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पेमेंट ऑपरेटर्सची डिजिटल सिस्टम फेल होऊ नये म्हणून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आता यावर सरकार किंवा आरबीआय विचार करून काही निर्णय घेईल का हे बघणं महत्वाचं असणार आहे.

checking bank account balance repeatedly may take you in trouble read full news 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: checking bank account balance repeatedly may take you in trouble read full news