
New Mumbai Airport: दि. बा. पाटलांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
मुंबई : नवी मुंबई विमानतळाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भातील माहिती माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सुभाष भोईर यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीट करत या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे.
(New Mumbai Airport Name)
नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं, यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. एकीकडे विमानतळाला स्थानिकांनी रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची तयारी काही दिवसांपूर्वी सुरु केली होती पण आता मुख्यमंत्र्यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
कोण आहेत दि. बा. पाटील?
दि. बा. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते रायगड जिल्हातील असून उत्तर कोकणातील शेकापचे नेते होते. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले होते.
दरम्यान याआधी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच नाव देण्यासाठी अनेक आंदोलन झाले आहेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार अशा विविध परिसरातून लोकांनी सिडको भवन परिसर तसेच नवी मुंबई (Navi mumbai) महानगरपालिका परिसरात जोरदार आंदोलन केले होते. दि. बा. पाटील यांचे या परिसरात त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे या विमानतळाला पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली जात होती.
Web Title: New Mumbai Airport Db Patil Nomination Cm Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..