
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : दिवसेंदिवस म्हाडावरील लोकांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. गोरगरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे विश्वासाचे दुसरे नाव म्हाडा असे बोलले जात आहे. त्यामुळे म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नव्या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत, असेही त्यंनी सांगितले.