मुंबई : कृषी पर्यटन धोरणात ६ महत्त्वाच्या सुधारणा, वाचा सविस्तर

महाराष्ट्र पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणात काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय
agri-tourism
agri-tourismsakal

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने (डीओटी) कृषी पर्यटन (agri-tourism) धोरणात काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यस्तरीय महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास समितीने (Agri Tourism Development )आपल्या बैठकीत हा निर्णय घेतला. नवीन सुधारणांमुळे कृषी संबंधित उद्योग आणि पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने तयार केलेल्या कृषी पर्यटन धोरणात काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करून काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच घेतला.

agri-tourism
जामीन नाकारल्यानंतर हालचालींना वेग; राणेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला

कृषी जमिनींचा भाडेकरार,परवानग्या, लोगो-नामफलक,कृषी प्रदर्शने,नवीन संधी,उत्पादनाची विक्री आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यासंबंधी नियमावलीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.कृषी पर्यटन प्रशिक्षणासाठी मॉडेल अभ्यासक्रम देखील तयार करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, जिल्हा कृषी अधिकारी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सदस्य, तज्ज्ञ कृषी पर्यटन केंद्र मालक आणि पर्यटन विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे हा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.यासाठी एक आढावा बैठक आयोजित करून प्रादेशिक अधिकाऱ्यांना कृषी पर्यटन केंद्रांच्या साइटला भेटी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते.त्यानुसार सहा वेगवेगळ्या प्रादेशिक ठिकाणांहून 500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले असे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.(Mumbai news)

agri-tourism
कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

या आहेत नवीन सुधारणा

एखादी शेतजमीन किमान 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिल्यास, भाडेपट्टेदाराच्या एनओसीसह त्या जमिनीवर कृषी पर्यटन केंद्र चालविण्यासाठी अर्ज करू शकतो.

जर एखाद्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये 8 पेक्षा जास्त खोल्या असतील तर त्यांना कृषी क्षेत्रासाठी नगर नियोजन नियमांनुसार बांधलेल्या क्षेत्राच्या निर्बंधासह परवानगी दिली जाईल.

प्रत्येक नोंदणीकृत संस्थेने कृषी पर्यटन केंद्रात महाराष्ट्र पर्यटनाचा लोगो असलेले पर्यटन विभागाचे अधिकृत केंद्र बोर्ड स्थापित केले पाहिजेत.

कृषी पर्यटन योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विभाग कृषी प्रदर्शनांमध्ये सहभागी होईल. तसेच, कृषी पर्यटन केंद्रांना साठे, ओटीएम, ओटीटीएम आणि इतर ट्रॅव्हल मार्ट्सवर डिओटी सह सह-प्रदर्शक म्हणून सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल.

महानगरपालिका, नागरी परिषद, नागरी पंचायत इत्यादींच्या हद्दीबाहेरील कृषी पर्यटन केंद्रांना काही अटींसह परवानगी दिली जाईल.

कृषी पर्यटन केंद्रे केंद्रावर स्थानिक पातळीवर उत्पादित अन्न, हस्तकला इत्यादी वस्तू विकू शकतात.

महाराष्ट्र पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणात काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कृषी संबंधी पर्यटनास अधिक चालना मिळणार आहे. कृषी पर्यटनासंबंधी योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा.

-डॉ. धनंजय सावळकर,सहसंचालक,

agri-tourism
मुंबई : तिसऱ्या लाटेचाही ज्येष्ठांना फटका!

महाराष्ट्र पर्यटन विभाग

कृषी पर्यटन धोरणात देखील नवीन सुधारणांचा लवकरच समावेश करण्यात येणार असून अद्ययावत धोरण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. खालील वेबसाईटवर आपण माहिती प्राप्त करू शकता. https://ww.maharashtratourism.gov.in/en/web/mh-tourism/policies

कृषी पर्यटन केंद्रे यावर आपली नोंदणी करू शकतात

https://ww.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/agro-tourism-registration

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com