
Dombivli Talathi Office
ESakal
डोंबिवली : डोंबिवली येथील तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडून त्या ठिकाणी नवीन कुलूप बसवण्यात आल्याचा अजब प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना विष्णुनगर पोलिसांसमोर वेगळाच प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात वित्त विभागात शिपाई काम करणाऱ्या एका तरुणाला देशाकरीता लढण्यासाठी फायटर तयार करायचे आहेत. या फायटरना प्रशिक्षण देण्याकरीता त्याला एका जागेची गरज होती आणि ती जागा त्याने तलाठी कार्यालयात शोधली होती. चावीवाल्याला ऑनलाइन पाठविलेल्या पैशाच्या तपशीलावरुन पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत याचा उलगडा केला असून त्याला अटक केली आहे. विक्रम प्रधान असे आरोपीचे नाव आहे.