कंत्राटदारांच्या मनमानीला बसणार अंकूश; हमी कालवधी संपल्यानंतर पुर्ण पैसे मिळणार 

कंत्राटदारांच्या मनमानीला बसणार अंकूश; हमी कालवधी संपल्यानंतर पुर्ण पैसे मिळणार 

मुंबई : कंत्राटदारांच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. रस्त्याचा हमी कालवधी संपल्यानंतर कंत्राटाराला कामाचे पुर्ण पैसे मिळणार आहेत. तसा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे.

रस्ता दुरुस्त केल्यानंतर डांबरी रस्त्यासाठी 3 वर्षांचा आणि सिमेंट कॉक्रीकटच्या रस्त्यासाठी 5 वर्षाचा हमी कालवधी असतो. या काळात रस्ता खराब झाल्यास खड्डे पडल्यास दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असते. मात्र, सध्याच्या नियमानुसार रस्त्याचं काम संपल्यानंतर पालिका कंत्राटदाराला पूर्ण पैसे देते. हे पैसे मिळाल्यानंतर कंत्राटदार रस्त्याची जबाबदारी घेण्याची टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून महापालिकेने कंत्राटदाराची 20 टक्के रक्कम राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ता दुरुस्त झाल्यावर कंत्राटाची 80 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. तर उर्वरीत 20 टक्के रक्कम हमी कालावधी संपल्यानंतर कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेच्या एका अधिकार्याने दिली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठीी रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.

मुंबई महापालिकेने यंदा रस्ते दुरुस्तीसाठी 1200 ते 1300  कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत 2055 किलोमिटरचे रस्ते आहेत. 2018-19 मध्ये महापालिकेने 134 किलोमिटरचे रस्ते दुरुस्त केले. त्यासाठी 1 हजार 189 कोटी रुपये खर्च झाले होते. तर , 2019-20 मध्ये 162 किलोमिटरचेे रस्ते दुरुस्त करण्यात आले. यासाठी 1 हजार 810 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात 200 किलोमिटरहून अधिक लांबीचे रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाा आहे.

new rules for road contractors full payment done at the end of the warranty

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com