महाविकास आघाडीतीलच पक्षाची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन

सुमित बागुल
Wednesday, 30 September 2020

अबू आझमी यांच्या माहितीप्रमाणे मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी अशी मागणी आझमींकडून केली जातेय.

मुंबई : महाविकास आघाडीतीलच एक पक्ष म्हणजे अबू आझमींचा समाजवादी पक्ष. याच समाजवादीच्या अबू आझमी यांनी आज थेट आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मंत्रालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केलीये. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आपला फोन उचलत नाहीत, आपली कामे ऐकत नाहीत म्हणून अबू आझमी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त करण्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन केलं.   

महत्त्वाची बातमी : किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार अर्ज दाखल

अबू आझमी यांच्या माहितीप्रमाणे मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी अशी मागणी आझमींकडून केली जातेय. मात्र महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि त्याची कामे ऐकत नाहीत आणि साधा फोनही उचलत नाहीत. आमचा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही पाठिंबा देऊनही ते आमची कामं ऐकत नाहीत म्हणून अबू आझमी यांनी आदित्य ठारेंविरोधात मंत्रालयाच्या गेटवर नारेबाजी केली. 

महत्त्वाची बातमी : बाबरी मशीद निकालाचे शिवसेनेकडून स्वागत; आडवाणी, उमा भारती, जोशींचे केले अभिनंदन

आजचा काळा दिवस 

आज कोर्टाने बाबरी मशीद प्रकरणाबाबत आपला निकाल दिलाय. यामध्ये पुरावांच्या अभावी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भरती आणि  एकूण ३२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर अबू आझमी यांनी आजचा दिवस काळा दिवस असल्याचं म्हटलंय. बाबरी जबरदस्ती पाडली गेली आणि सर्वांनी ते पाहिलं. आता या देशात असंच सुरु राहणार, तपास यंत्रणा या मोदी आणि अमित शाह यांचे बाहुले आहेत. त्यामुळे या देशात आता असंच चालत राहणार, असंही अबू आझमी म्हणालेत. 

samajwadi party leader abu aazmi did agitatin against aaditya thackeray

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samajwadi party leader abu aazmi did agitatin against aaditya thackeray