अंगाडिया खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठा धक्का, नव्या ट्विस्टमुळे खळबळ

आता हे प्रकरणा आणखी नवे वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
crime, Angadia Extortion Case News Updates, Angadia Ransom Case
crime, Angadia Extortion Case News Updates, Angadia Ransom Caseesakal
Summary

आता हे प्रकरणा आणखी नवे वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील महिन्यात अंगाडिया खंडणी प्रकरणातील (extortion case) आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai session court) नामंजूर केला. मात्र आता या खंडणी प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. अंगडिया व्यवसायिक आरोपी पोलिसांना ओळखण्यात अपयशी ठरल्याची माहिती समोर येत आहे. डांबून ठेऊन रक्कम स्वीकारल्याचा आरोप असलेल्या तीन पोलिसांना ओळखण्यात अंगडिया व्यवसायिक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरणा आणखी नवे वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Angadia Extortion Case News Updates)

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ओळख झालेल्या परेडमध्ये कोणत्या पोलिसाने पैसे घेतले आहेत, ते अंगडिया व्यवसायिकांना सांगता आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी पोलिस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे या तीन आरोपी पोलिसांविरोधात एक हजारपेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र शनिवारी न्यायालयात दाखल केले होते.

crime, Angadia Extortion Case News Updates, Angadia Ransom Case
आमदार मिटकरींच्या अडचणी वाढणार? नाशिकमध्येही गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठीही फरार आरोपी आहेत. आर्थर रोड तुरुंगात या महिन्याच्या सुरूवातीला ही ओळख परेड झाली होती. त्यावेळी अंगडिया व्यवसायिकांना तेथे उभे असलेल्या अनेक व्यक्तींपैकी तीन आरोपी पोलिसांना ओळखण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्यासमोर उभ्या कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडून पैसे घेतले नसल्याचे अंगडिया व्यवसायिकांनी सांगितले आहे.

ओळख परेड हा गुन्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा असतो. पण त्या व्यक्तीरिक्तही याप्रकरणी आरोपी पोलिसांविरोधात अनेक पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपपत्रात ७० साक्षीदारांच्या जबाबांचा सहभाग आहे. याशिवाय प्रकरणातील अंगडिया व्यावसायिकांचे जबाब महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणात उत्तर प्रदेशातील जीएसटी सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा आणि सौरभ त्रिपाठी यांचा नोकर पप्पूकुमार गौड यांना अटक केली होती. आशितोष मिश्रा हे त्रिपाठी यांचे मेहुणे आहेत. त्रिपाठी यांचे वडील नीळकंठ त्रिपाठी यांनीही त्रिपाठी यांनी पाठवलेली रक्कम स्वीकारल्यामुळे त्यांनाही याप्रकरणी आरोपी दाखवण्यात आले आहे.

crime, Angadia Extortion Case News Updates, Angadia Ransom Case
पवारांच्या घरावरील आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांचा धक्कादायक दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com