mumbai local
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांचे मंगळवारपासून (१ सप्टेंबर)नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. प्रवाशांची मागणी आणि सेवांची गरज लक्षात घेऊन लोकलच्या मार्ग आणि वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एकूण १,४१४ फेऱ्या कायम ठेवून सहा नवीन धीम्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. त्याचवेळी कमी मागणीच्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वातानुकूलित लोकलच्या दोन फेऱ्यांचीही भर पडणार आहे.