New_Year_2021 | संचारबंदी झुगारून नववर्षाचा जल्लोष; अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी

New_Year_2021 | संचारबंदी झुगारून नववर्षाचा जल्लोष; अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी

अलिबाग  : रात्रीच्या संचारबंदीकडे दुर्लक्ष करत जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत नागरिकांनी नववर्षाचा जल्लोष केला. जिल्हा पोलिसांनी नाक्‍यानाक्‍यावर पहारा ठेवला असतानाही नागरिक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरले होते. 

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची पूर्वकल्पना आठवड्यापूर्वीच दिलेली असल्याने पर्यटकांचा उत्साह कमी असेल असा अंदाज येथील व्यावसायिकांचा होता. नववर्ष स्वागताचे कार्यक्रमही रद्द करावे लागल्याने मुंबई-पुण्यातल्या पर्यटकांनी अलिबाग, मुरूड येथे येण्याचे टाळले होते. त्यामुळे येथील चौपाट्यांवर पर्यटकांची वर्दळ काही प्रमाणात कमी होती, परंतु स्थानिक नागरिकांनी ही कसर भरून काढत रात्रीच्या संचारबंदीला न जुमानता समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली होती. नाक्‍यानाक्‍यावर पोलिस बंदोबस्त असतानाही नागरिक बाहेर पडले. अलिबाग, मुरूड समुद्रकिनारी रात्री बारा वाजता जमा होत नागरिकांनी उत्साहात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. 

कोरोनामुळे वर्षभर पोलिसांच्या कारवाईला घाबरून बाहेर न पडणाऱ्या नागरिकांना थर्टीफर्स्टच्या रात्रीही तशीच भीती होती; परंतु रात्रीही रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनाही आश्‍चर्य वाटले. येणाऱ्या जाणाऱ्यांना आपुलकीने घरी जाण्याचा सल्ला पोलिस देत होते. पोलिसांच्या अशाप्रकारे मित्रत्वाच्या वागण्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 

New Year 2021 celebrations Crowds on the beach in Alibag

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com