

Impact of Ekadashi on New Year Parties
Sakal
विरार : नववर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी सर्वजण एकत्र येत असतात मग सुरु होते ती मद्याची पार्टी परंतु यावर्षी मात्र तळीरामाचा हिरमोड होणार आहे. कारण ३१ डिसेंमबरला एकादशी आली आहे. त्यामुळे सर्व बार बंद असणार आहेत. त्यामुळे ३१ तारखे पूर्वी येणाऱ्या २८ तारखेच्या रविवारी साजरी करण्यात येणार आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताला उपवासाचा अडसर येत असल्याने जल्लोषाच्या नियोजनात मोठा बदल पाहायला मिळत आहे.