नव्या वर्षाचा उत्साह निर्बंधांमुळे थंडावला; घरात राहूनच स्नेहभोजनाचा घेतला आस्वाद

दीपक घरत
Friday, 1 January 2021

सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे नव्या वर्षाचे स्वागत कोणत्याही गाजावाज्याशिवाय शांततेत पार पडले. अनेकांनी घरीच राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

पनवेल  ः कोरोनामुळे अडचणीच्या ठरलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येईल, अशी अपेक्षा असतानाच सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात नव्या वर्षाचे स्वागत कोणत्याही गाजावाज्याशिवाय शांततेत पार पडले. अनेकांनी घरीच राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

रात्र संचारबंदी, पोलिस बंदोबस्त याबाबत वारंवार केलेली जनजागृतीमुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यातच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने खवययांनी शाकाहारी भोजनाला पसंती दिली. लोकं घराबाहेर पडले नसल्याचा परिणाम परिसरातील हॉटेल,बार, फॅमिली रेस्टोरंट आणि फार्म हाऊस मालकांसोबत फास्ट फूड विक्रेत्यांच्या व्यवसायावर जाणवला असून दर वर्षी नव्या वर्षाच्या स्वागताच्या दिवशी बसायला देखील जागा न मिळणाऱ्या हॉटेल आणि फॅमिली रेस्टॉरंट मधील जवळपास 25 टक्के जागा रिकाम्याच राहिल्याचे पाहायला मिळाले असून, नव्या वर्षाच्या स्वागताच्या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा असलेल्या व्यवसईकांचा मात्र हिरेमोड झाला आहे. 

कोरोना कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम, रुग्णालयीन ऑक्सिजन वापराचे प्रमाण निम्म्याने घटले

सोशल मीडिया फॉर्मात 
नवीन वर्षाच्या स्वागताला रस्त्यावर जरि अनुत्साह जाणवला असला तरी दुसरीकडे मात्र सोशल नेटवर्किंगवर नवीन वर्षाचं स्वागत अगदी सालाबादप्रमाणे यंदाही पद्धीतने झालं. हॅशटॅग, पोस्ट, कमेंटस, लाईक, शेअरच्या जगात नवीन वर्षाचं स्वागत करताना करोनामुळे फारसं काही बिघडल्याचं चित्र दिसलं नाही. अनेकांनी तर 2020 संपत असल्याचा आनंद शब्दात मावेनासा असून 2021 कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत असं सांगतानाच 2020 मधील अनेक संकल्प आणि राहून गेलेल्या गोष्टी यंदाच्या वर्षी करण्याचा निर्धार केलाय .

New Years excitement down due restrictions people Stayed at home

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Years excitement down due restrictions people Stayed at home