कोरोना कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम, रुग्णालयीन ऑक्सिजन वापराचे प्रमाण निम्म्याने घटले

कोरोना कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम, रुग्णालयीन ऑक्सिजन वापराचे प्रमाण निम्म्याने घटले

मुंबई, 01 : राज्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम ऑक्सिजन वापरावर ही झाला आहे. राज्यात रुग्णालयीन ऑक्सिजन वापराचे प्रमाण 50 टक्क्याने घटले आहे. सप्टेंबर महिन्यात 800 ते 900 मेट्रिक टन रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचा वापर व्हायचा मात्र, आता हे प्रमाण 400 मेट्रिक टनावर पोहोचले आहे.  

गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्राचा सक्रिय रुग्णांचा भार 3 लाखांहून कमी होऊन 60,000 पेक्षा कमी झाला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाकीमध्ये दररोज 10,000 लिटर ऑक्सिजनचे रिफिलिंग करण्याऐवजी आता दर तीन ते चार दिवसांनी ऑक्सिजनचे रिफिलिंग करावे लागत आहे, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता कमी झाली आहे. मात्र, ऑक्सिजनचा वापर पूर्व-कोविड काळात जितका वापर भारतात होत होता त्यापेक्षा दुप्पट वापर होत आहे असे ऑल इंडिया इंडस्ट्रियल गॅस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिकू यांनी सांगितले.

मार्चपासून संपूर्ण भारतात दररोज वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी 750 ते 800 मेट्रिक टन होती. ती सप्टेंबरमध्ये 2,500 मेट्रिक टनवर पोहचली आणि गेल्या महिन्यात 1700 ते 1800 मेट्रिक टनपर्यंत त्याचा वापर घसरला.

महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत समान मागणी दिसून आली आहे. कोरोना महामारीच्या आधी 350 ते 400 मेट्रिक टनवरून सप्टेंबरपर्यंत 850 ते 900 मेट्रिक टन पर्यंत वाढ झाली. आता, दररोजची मागणी 400 मेट्रिक टनपेक्षा कमी आहे.

सप्टेंबरमध्ये राज्यात ऑक्सिजनचा औद्योगिक वापर एकूण उत्पादनाच्या 20 टक्के इतका मर्यादित केला गेला आणि कोविड रुग्णांवर उपचारांची परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्यात 3 लाखांहून अधिक सक्रिय केसेस होते, त्यापैकी १० टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. तर, गंभीर रुग्णांना प्रति मिनिट 40 ते 60 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले की, दोन घटकांमुळे ऑक्सिजनचा वापर कमी झाला आहे. "संसर्गाची संख्या आणि तीव्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वीसारखे आता ऑक्सिजन मिळवण्यासाठी रूग्णांना अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड -19 रुग्णांची टक्केवारी कमी झाली आहे."

मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोविड -19 सुविधा असलेल्या सर्व जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची साठवूणक केली केली जाणार आहे. दुसर्‍या लाटेच्या संभाव्यतेने तयारी ठेवली जात आहे.

जानेवारी अखेरीस निर्णय घेण्याची योजना आहे. दुसरी लाट आली तर आम्ही आमच्या कोविड -19 केंद्रे फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवू शकतो. आम्ही कोणत्याही प्रसंगासाठी तयार आहोत. महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या नवीन ऑक्सिजनच्या टाक्या दीर्घकाळ रिक्त ठेवता येतील. असे नाही की ऑक्सिजनचा वापर शून्यावर आला आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

use of oxygen dropped by fifty percent due to reduced number of covid patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com