नालासोपारा दुर्घटना! 'सकाळ'ने आधीच वेधले होते धोकादायक इमारतींकडे लक्ष 

प्रसाद जोशी 
Wednesday, 2 September 2020

वसई-विरार महापालिका हद्दीत निकृष्ट दर्जाचे होणारे अनधिकृत बांधकाम तसेच शहरातील जीर्णावस्थेत, अतिधोकादायक इमारतींचे आव्हान असून महाड दुर्घटनेनंतर वसई-विरार महापालिकेतील अनधिकृत बांधकामे आणि धोकदायक इमारतींच्या प्रश्‍नाकडे "सकाळ'ने  27 ऑगस्ट रोजी बातमी देऊन लक्ष वेधले होते.

वसई  ः वसई-विरार महापालिका हद्दीत निकृष्ट दर्जाचे होणारे अनधिकृत बांधकाम तसेच शहरातील जीर्णावस्थेत, अतिधोकादायक इमारतींचे आव्हान असून महाड दुर्घटनेनंतर वसई-विरार महापालिकेतील अनधिकृत बांधकामे आणि धोकदायक इमारतींच्या प्रश्‍नाकडे "सकाळ'ने  27 ऑगस्ट रोजी बातमी देऊन लक्ष वेधले होते.

'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

नालासोपारा शहरात चारमजली इमारत कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर तरी कृतिशील पावले उचलण्यासाठी महापालिका जागी होणार का, असा सवाल समोर येत असून सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली, तरी महापालिकेचा कारभार पाहता नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे समोर येत आहे. 

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा
वसई-विरार शहरातील नऊ प्रभागांत 563 इमारती जीर्णावस्थेत असून यातील 150 हून अधिक इमारती या धोकादायक व अतिधोकादायक आहेत. 
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी इमारतींना नोटिसा देत सदनिका रिकामी करण्याचे आवाहन रहिवाशांना केले जाते, परंतु यातील अनेक कुटुंबे तरी धोकादायक इमारतींमध्ये आपला जीव मुठीत ठेवून राहत आहेत. पुनर्बांधणीसाठी एकमत नसल्याने इमारत "जैसे थे' परिस्थितीत राहते; तर धोकादायक इमारत असतानादेखील हलाखीची परिस्थिती, नवीन सदनिकांचे वाढलेले दर तसेच जुनी इमारत दुरुस्त करण्यात येणारा खर्च अशा प्रश्‍नांमुळे लोक जुन्या इमारतीतच राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्यात या धोकादाक इमारतीमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था पालिका करत नाहीत, त्यामुळे जीव टांगणीला असताना अनेक रहिवासी कुटुंबासह नादुरुस्त इमारतीत राहत आहेत. 

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

अनधिकृत बांधकामांचे पेव 
जीर्णावस्थेतील, अतिधोकादायक इमारतींचा प्रश्‍न समोर आहेच; मात्र नव्याने निकृष्ट दर्जाची अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाटदेखील शहरात होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच अशा बांधकामांना भुईसपाट करण्याची गरज आहे; अन्यथा धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येईल, अशी भावना वसई-विरारकर व्यक्त करत आहेत. 

वसई-विरार शहर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. अनेक इमारतींतील कुटुंबांनी स्थलांतरदेखील केले आहे. पुन्हा अतिधोकादायक इमारतींत कुटुंबे वास्तव्य करत आहेत का याचा सर्व्हे करून इमारती पूर्णपणे रिकाम्या करण्यात येणार आहेत. धोकादायक इमारतीत नागरिकांना राहू नये. 
- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका 

 

                                   (संपादन ः रोशन मोरे)

The news about dangerous buildings in Vasai Virar Municipal Corporation was published in the sakal?amp


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The news about dangerous buildings in Vasai Virar Municipal Corporation was published in the sakal?amp