'कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद हे भाजपकडेच राहील'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यास भाजप पक्षाकडून नकार देण्यात आल्याचं समजतंय. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहील, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतलीये. 

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलाय. अशात आता शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी बातमी दिल्लीतून समोर येतेय. महाराष्ट्रात जशा एका मगोमाग एक बैठका होतायत तशाच बैठका दिल्लीतही होतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीये. दरम्यान, भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलंय.

या बैठकीमध्ये शिवसेनेसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. दरम्यान, मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यास भाजप पक्षाकडून नकार देण्यात आल्याचं समजतंय. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहील, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतलीये. 

दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. याच सोबत भूपेंद्र यादव आणि अमित शाह यांचीदेखील चर्चा झाली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठाम असल्याचं दिल्लीतून समजतंय. यात मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आता समोर येतेय 

नितीन गडकरी आणि अहमद पटेल यांची दिल्लीत भेट 

सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय हलचाली वाढू लागल्यात. दिल्लीमध्येही राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसतय. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट झालीय. गडकरी यांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालीय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र, या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावर काहीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातंय. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गडकरींना भेटलो, असं पटेलांनी म्हटलय.

WebTitle : news from delhi BJP sources says says CM post will not be spared in any condition :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news from delhi BJP sources says says CM post will not be spared in any condition