esakal | Sachin Waze | NIA कोर्टाने अपील फेटाळली, वाझेला तळोजा कारागृहात पाठवणार
sakal

बोलून बातमी शोधा

sachin-waze 2.jpg

NIA कोर्टाने वाझेची मागणी फेटाळली, तळोजा कारागृहात पाठवणार

sakal_logo
By
ओमकार वाबळे

एनआयए कोर्टाने मुंबई पोलीस दलाचा निलंबित अधिकारी सचिन वाझे याची मागणी फेटाळली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत वाझेच्या वकिलांनी त्याला नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली होती. मात्र एनआयएच्या विशेष न्यायालयाने ही अपील फेटाळली आहे. त्यामुळे वाझेला तळोजा कारागृह रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर वाझेने नजरकैदेत राहू देण्याची मागणी केली होती. यासाठी तीन महिन्यांची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर ती फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे वाझेची रवानगी पुन्हा तुरुंगात होईल.

loading image
go to top