मोठी बातमी! पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात NIA कडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; आरोपपत्रात धक्कादायक खुलासे समोर

जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीची योजना आखत आयईडी स्फोटक बनवत होते.
Pune ISIS Module Case
Pune ISIS Module Caseesakal
Summary

एनआयएने आरोपपत्रात अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार केला असून त्यासाठी त्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडल्याचे म्हटले आहे.

मुंबई : पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात (Pune ISIS Module Case) एनआयएकडून (NIA) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनआयएनं केलेल्या तपासात मॉड्यूलमधील आरोपी दहशतवादी (Terrorist) उच्चशिक्षित असल्याचं समोर आलं आहे.

Pune ISIS Module Case
Loksabha Election : एक दिवस मी भारताच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होईन; महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास

अटक आरोपी जुल्फिकारला मल्टी नॅशनल कंपनीत ३१ लाख रुपयांच्या पॅकेजवर कार्यरत असल्याचे तपासात माहिती मिळत आहे या आरोपींनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड ठेवले होते. या प्रकरणात आरोपीवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे.

Pune ISIS Module Case
'या' योजनेवरून कोल्हापुरात राजकारण तापलं; सतेज पाटील-क्षीरसागर आमनेसामने, इंगवलेंनीही घेतला बंटींचा समाचार

दहशतवादी कारवायांचा प्लॅन

एनआयएने आरोपपत्रात अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार केला असून त्यासाठी त्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडल्याचे म्हटले आहे. जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीची योजना आखत आयईडी स्फोटक बनवत होते. तसेच पुणे शहरातील अनेक भागांतील युवकांचे दहशतवादी कारवाया करण्यासाठी मन परिवर्तन करुन त्यांना दहशतवादाकडे ओढत होते. मोहम्मद इमरान, मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका, आमिर अब्दुल हमीद, मोहम्मद युनुस, मोहम्मद याकूब साकी उर्फ आदिल आणि सलीम खान यांनी हे प्रकार केले होते. अली बडोदावाला आणि साकिब नाचन यामध्ये आरोपी आहे. आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा इंजिनिअर होता.

कोडवर्डचा वापर

अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता. अतिरेक्यांनी अनेक राज्यात दहशतवादी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून दुचाकीचा वापर ते करत होते.

Pune ISIS Module Case
Deepak Kesarkar : मंत्री केसरकर खरंच आमदारकी सोडून खासदारकी लढवणार? स्वत:च केला 'या' मतदारसंघावर दावा!

उच्चशिक्षित आरोपी

एनआयएने अटक केलेला आरोपी जुल्फिकार हा एका मल्टीनेशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याला तब्बल 31 लाख रुपये वार्षिक पॅकेज होते. अटक केलेल्या सर्वच अतिरेकी उच्चशिक्षित होते. त्यातील कादीर पठाण ग्राफिक डिजाइनर होता. आयईडी बनवण्यासाठी सहज उपलब्ध होणारे थर्मामीटर, 12 वॅटचा बल्ब, फिल्टर पेपर, आगपेटी, स्पीकर वायर आणि सोडा पावडरचा ते वापर करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com