एनआयएची मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ‘गझवा-ए-हिंद’ दहशतवादी मॉड्यूलवर छापेमारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA raid

दहशतवाद्यांच्या 'गझवा-ए-हिंद' मोड्युल प्रकरणात एनआयएने गुरूवारी 3 राज्यांमध्ये 8 संशयितांच्या घरांवर छापे टाकले झाडाझडती घेतली.

NIA Raid : एनआयएची मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ‘गझवा-ए-हिंद’ दहशतवादी मॉड्यूलवर छापेमारी

मुंबई - दहशतवाद्यांच्या 'गझवा-ए-हिंद' मोड्युल प्रकरणात एनआयएने गुरूवारी 3 राज्यांमध्ये 8 संशयितांच्या घरांवर छापे टाकले झाडाझडती घेतली. एनआयएने नागपूर मधील 4 ठिकाणे, मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर तसेच गुजरातमधील वलसाड, सुरत आणि बोताड जिल्ह्यातील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. छापेमारी दरम्यान डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन, मेमरी कार्ड आणि कागदपत्रांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गझवा-ए-हिंद मॉड्यूलवर कारवाई

जुलै 2022 मध्ये, पाटणा येथील फुलवारी शरीफमध्ये गझवा-ए-हिंद मॉड्यूलच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गझवा-ए-हिंद मॉड्यूल पाकिस्तानमधून संचालित आणि नियंत्रित केले जात होते. पाकिस्तानी नागरिकाने सुरू केलेल्या ‘गझवा-ए-हिंद’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन मरघूब अहमद दानिश उर्फ ताहिर याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.एनआयएने मरघूब अहमद दानिश विरुद्ध जानेवारी 2023 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

सोशल मिडियातून कट्टरवादी प्रचार

आरोपी मरघूबने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘गझवा-ए-हिंद’ ग्रुप तयार केले होते. त्यांनी बांगलादेशी नागरिकांसाठी एक समर्पित व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार केला होता. मरघूबने भारतातील तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि येमेनमधील अनेकांना या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले होते. मॉड्युलचा उद्देश भारतीय तरुणांना कट्टरपंथी बनवणे होते. ‘गझवा-ए-हिंद’.या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सदस्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी ‘स्लीपर सेल’मध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने कट्टरतावादी बनवले जात होते.