NIA raids Mumbai I मुंबईत NIA ची धडक कारवाई, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suhail Khandwani

मुंबईत NIA ची कारवाई, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त

सकाळपासूनच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर मुबंईमधून आणखी एक बातमी सध्या समोर येत आहे. आता एनआयएच्या पथकानं मुंबईच्या माहीममध्ये ४ ठिकाणी छापेमारी केली आहे. माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणी यांच्या मालमत्तावरही छापेमारी करण्यात आली आहे. तसेच बाबा फालुदाचे मालक अस्लम सोरटिया यांच्या मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईत दाऊदशी संबंधित सध्या २९ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून ग्रॅंट रोड परिसरात एनआयएने कारवाई केली असल्याने खळबळ निर्माण झाली आहे. (NIA raids Mumbai Seizes assets of Mahim Dargah trustee Suhel Khandwani)

हेही वाचा: 'शिवसेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते, पाहून कीव येते'

मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट या नावाने ओळखला जातो. कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळचा आहे. छोटा शकील त्याला आपल्या भावाप्रमाणे वागवतो. सलीमचा विवाह छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे, तर सलीम दुबईला फळे निर्यात करत होता. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट हे नाव पडले आहे. दुबई आणि लंडनमध्ये त्यांचा कार्यालय आहे. दुबईमध्ये सलीमचा एक आलिशान बंगलाही आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळपासून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) यांच्या निकटवर्तीयांभोवती केंद्रीय तपास संस्थांनी फास आवळला असून राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आज मुंबईत २० ठिकाणी छापे घातले. गोरेगांव, नागपाडा, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडीबाजारसह अनेक ठिकाणांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईत दाऊदचे हवाला ऑपरेटर, ड्रग्ज तस्करीतील दलाल हे NIA च्या रडावर आहेत. फेब्रुवारी मध्ये NIA ने दाखल करून घेतलेल्या गुन्ह्या संदर्भत ही कारवाई सुरू आहे.

हेही वाचा: दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन

दरम्यान, दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गृहमंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये NIA कडे सोपवली होती. NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा ही दहशतवादासंबंधी तपास करणारी देशातली सर्वात मोठी यंत्रणा आहे. याआधी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडे होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सामील असल्याचं समोर आल्यानंतर भारत व संयुक्त राष्ट्रसंघानं दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. दाऊद सध्या पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचं बोललं जातं. आता त्याच्या निकटवर्तींयावर सुरु झालेल्या छापेमारीमुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Nia Raids Mumbai Seizes Assets Of Mahim Dargah Trustee Suhail Khandwani From Morning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top