Wed, May 25, 2022

दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन
दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन
Published on : 9 May 2022, 3:04 am
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी NIA कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दाऊदच्या २० हून अधिक जवळच्या व्यक्तींवर हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून हाती येत आहे.
गोरेगांव, नागपाडा, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडीबाजारसह अनेक ठिकाणांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईत दाऊदचे हवाला ऑपरेटर, ड्रग्ज तस्करीतील दलाल हे NIA च्या रडावर आहेत. फेब्रुवारी मध्ये NIA ने दाखल करून घेतलेल्या गुन्ह्या संदर्भत ही कारवाई सुरू आहे.
दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गृहमंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये NIA कडे सोपवली होती. NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा ही दहशतवादासंबंधी तपास करणारी देशातली सर्वात मोठी यंत्रणा आहे. याआधी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडे होती.
Web Title: Nia Search Operation On Persons Related To Dawood Abrahim
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..