
Mumbai: शेकडो वर्षांपूर्वीपासून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दिली.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांची शुक्रवारी (ता. ३) त्यांच्या सुवर्णगड बंगल्यात बैठक झाली.