esakal | हुक्का फ्लेवरचा 9 कोटींचा निकोटीनयुक्त साठा जप्त | Thane
sakal

बोलून बातमी शोधा

Hukka-Parlour

हुक्का फ्लेवरचा 9 कोटींचा निकोटीनयुक्त साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे - भिवंडीतील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा टाकून हुक्का फ्लेवरचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटकडून जप्त करण्यात आला होता. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीनुसार धाडसत्र राबवित 9 कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा हुक्का फ्लेवरचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

भिवंडीतील धामनकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा टाकून आठ हजार ९४० रुपयांचे ५७ प्रकारचा हुक्का फ्लेवर्सचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडीतील युनिट दोनच्या पथकाने जप्त केला. त्यावेळी नारपोली पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ते ९ ऑक्टोबर रोजी दापोडागाव परिसरातील हरीहर कॉम्प्लेक्स येथील कृष्णा कन्स्ट्रक्शन या इमारतीमधील गोदामात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने टाकण्यात आलेल्या धाडीत निकोटीनयुक्त अफजल हुक्का फ्लेवरचे आठ कोटी २ लाख ४९ हजार ६१० रुपयांचे २८६२ बॉक्स आणि सोएक्स हर्बल फ्लेवरचे ९४ लाख २८ हजार ९१० रुपयांचे ३७५ बॉक्स असा 9 कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचे हुक्का फ्लेवरचा माल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top