Nipani Election : 'उत्तम तू लढत रहा, बाकीचं मी बघून घेतो'; पराभवानंतरही शरद पवारांनी थोपटली पाठ

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उत्तम पाटील (Uttam Patil) यांनी भेट घेतली.
Uttam Patil met Sharad Pawar in Mumbai
Uttam Patil met Sharad Pawar in Mumbaiesakal
Summary

पुढील महिन्यात निपाणी दौरा करून तेथील कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

निपाणी : विधानसभा निवडणुकीत (Nipani Assembly Election) पहिल्याच प्रयत्नात उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामध्ये तब्बल ६५ हजारांवर मते घेतली. थोडक्यात त्यांचा पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उत्तम पाटील (Uttam Patil) यांनी भेट घेतली. त्यावेळी श्री. पवार यांनी उत्तम पाटील यांनी यापुढेही लढत राहावे, त्यांना कोणती जबाबदारी द्यायची, हे मी पाहून घेतो, अशा शब्दात शरद पवार यांनी उत्तम पाटील यांच्या पाठीवर थाप मारली आहे.

शिवाय, बारामतीच्या धर्तीवर निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तम पाटील व अभिनंदन पाटील बंधूंनी पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

Uttam Patil met Sharad Pawar in Mumbai
Deepak Pawar : भाजप आमदार शिवेंद्रराजेंना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार; राष्ट्रवादीच्या पवारांचा थेट इशारा

पवार म्हणाले, 'पहिल्याच लढतीत उत्तम पाटील यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यात काँग्रेसची लाट असतानाही उत्तम पाटील यांनी घेतलेली दुसऱ्या क्रमांकाची मते महत्त्वाची आहेत. मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी यापुढेही लढत राहावे. त्यांना पदाच्या माध्यमातून कोणती जबाबदारी द्यायची याचा सविस्तर विचार करून निर्णय घेऊ.'

Uttam Patil met Sharad Pawar in Mumbai
Karnataka : सिद्धरामय्यांमुळंच युती सरकार कोसळलं; सत्ता स्थापन करण्यापूर्वीच दोन बड्या नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट

उत्तम व अभिनंदन यांनी बारामतीला भेट देऊन तेथील विकासाची पाहणी करावी. बारामतीच्या धर्तीवर निपाणी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू. पुढील महिन्यात निपाणी दौरा करून तेथील कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचीही भेट घेऊन पाटील बंधूंनी त्यांना निवडणुकीतील घटनाक्रम सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com