'निसर्ग'चा बीकेसीतील कोविड केंद्राला फटका; यंत्रसामुग्रीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळावे म्हणून पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

मुंबई ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळावे म्हणून पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे सर्वच रुग्णालये हाऊसफुल झाल्याने महापालिकेने मुंबईत विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालये उभारले आहे. त्यात बीकेसीतील एमएमआरडीए मैदान, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, वरळीतील एनएससीआय येथे भव्य कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आली.

मोठी बातमी ः लॉकडाऊनमध्ये मुले बळी पडतायत 'या' घटनांना; अभ्यासाकडेही होतंय दुर्लक्ष

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या 1000 खाटांच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये नुकतेच रुग्णांना दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. कालपर्यंत तिथे जवळपास 150 ते 200 रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर येथील रुग्णांना वरळीच्या एनएससीआय केंद्रात हलवण्यात आले. मात्र निसर्ग वादळाचा फटका या सेंटरला बसलाच. या जम्बो फॅसिलिटी कोव्हिड केंद्राची निसर्ग वादळाने आज दुर्दशा झाली. 

मोठी बातमी - 120 कोरोना रुग्णांना दिलं 'हे' औषध त्यातले 108 झालेत बरे; जाणून घ्या कोणतं आहे 'हे' औषध

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर कोव्हिड केअर सेंटर केंद्र उभारण्यात आले. वादळ आणि पावसाच्या तडाख्याने या केंद्राची आज दैना उडाली. वादळाचा धोका लक्षात घेऊन येथील 212 रुग्णांना वरळी येथील एनएससीआय कोव्हिड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले.  

मोठी बातमी ः मुंबईकरांनो संकटाच्या काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण....

मुंबईत निसर्ग वादळ थेट धडकले नसले तरी वादळाचा परिणाम  जाणवला. त्यामुळे बीकेसीतील कोव्हिड केअर सेंटरचा बोजवारा उडाला. वारा आणि पावसाने या सेंटरचे पार्टिशन फाटले. त्याभोवती लावलेले पत्रेही उडाले. आतमधील यंत्रसामुग्रीचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी तंबूंचा सांगाडा शिल्लक राहिलेला दिसत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nisargta cyclone damaged covid care centre at mmrda ground bkc