
मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी असून, यंदाच्या हंगामात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या हंगामात ही वाढ आणखी होण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. तलावातील गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, म्हणून कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचेही आदेश त्यांनी दिले.