esakal | शाब्बास मुंबई..!! निती आयोगाच्या CEO कडून कौतुकाची थाप
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Office

BMC आयुक्त चहल यांची डॉ. अमिताभ कांत यांनी थोपटली पाठ

शाब्बास मुंबई..!! निती आयोगाच्या CEO कडून कौतुकाची थाप

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second Wave) भीतीदायक परिस्थिती निर्माण केली आहे. देशातील रूग्णसंख्या रोज ४ लाखांच्या आसपास जात आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईत (Mumbai) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रूग्णवाढीचा स्फोट झाला होता. मुंबईतील परिस्थिती तर नियंत्रणाबाहेर गेली होती. अशा वेळी मुंबईचे पालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह (Iqbal Singh Chahal) चहल यांनी एक मॉडेल राबवलं आणि त्याच्यामुळेच मुंबईची रूग्णसंख्या आता हळूहळू आटोक्यात येऊ लागली असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबई मॉडेलचं (Mumbai Model) कौतुक केल्यानंतर आता निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अमिताभ कांत (Dr. Amitabh Kant) यांनी मुंबई मॉडेलची स्तुती केली असून पालिका आयुक्त चहल यांचे अभिनंदन केले आहे. (NITI Aayog CEO Dr Amitabh Kant Praises Mumbai Model BMC Iqbal Singh Chahal Oxygen Management)

हेही वाचा: Coronavirus: सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचे तोंडभरून कौतुक

दुसऱ्या लाटेच्या सुरूवातीला मुंबईत करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला होता. वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडू लागल्या होत्या. पण मुंबई मॉडेलने अनेकांचे जीव वाचवले. बेड्स मिळण्याबाबत केलेलं केंद्रीकरण, ऑक्सिजन साठ्यासाठीची प्रणाली, खासगी रूग्णालयांमध्येही कोविड रूग्णांसाठी राखीव बेड्स, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एक डॅशबोर्ड, समस्यांचे निराकरण करण्यासाठी वॉर रूम्स... मुंबईचे मॉडेल हे कोविड काळातील व्यवस्थापनाच्या दृष्टीने खूपच प्रेरणा देणारे आहे. असे मॉडेल तयार करण्यासाठी मुंबई पालिका, आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे आभार आणि अभिनंदन, असं ट्वीट करत नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी मुंबई मॉडेलला कौतुकाची थाप दिली.

सुरूवातीला रुग्णांची होणारी गैरसोय पाहता मुंबईतील परिस्थिती फार विचित्र होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नंतर विविध उपाययोजना केल्याने यंत्रणेमध्ये शिस्त आली. त्यामुळेच मुंबई महापालिकेला भयावह अशा परिस्थितीवर पकड मिळवणे काही अंशी शक्य झाले. मुंबईतील परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं आशादायक चित्र दिसतंय. दुसऱ्या लाटेचा अचानक उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, महापालिकेकडून तातडीने हालचाल करण्यात आली. मुंबईच्या मॉडेलचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केल्यानंतर केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही महापालिका आयुक्तांची पाठ थोपटली.