"पावसात भिजल्यास भविष्य आहे" - नितीन गडकरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मुंबईत पार्ल्यात आज 'पार्ले कट्टा' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी हजेरी लावली.  या कार्यक्रमावेळी पावसानेही अचानक पावसाने हजेरी लावली. खरतर नोव्हेंबरमध्ये पाऊस येत नाही म्हणून हा कार्यक्रम ओपन फोरम पद्धतीने घेण्यात येतो.

अशातच या कार्यक्रमात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पडणाऱ्या पावसावर नितीन गडकरी यांनी मार्मिक टिप्पणी केली. "पावसात भिजल्यास भविष्य आहे" असं म्हणत नितीन गडकरी यांनी पडणाऱ्या पावसात शरद पवारांवर मिश्कील स्वरूपात टोला लागवलाय. शरद पवारांची साताऱ्यातील सभा चांगलीच गाजली होती. पवारांनी पावसात भिजत भाषण करत सर्वांचीच मनं जिकली होती.  

दिलखुलास गप्पांमध्ये नितीन गडकरी यांनी अनेक प्रश्नांवर अगदी मोकळी-चोकळी उत्तरं दिलीत. अच्छे दिन, महाराष्ट्रासह देशभरातील रस्ते, वाहतूक याचबरोबर अनेक योजनांबद्दल नितीन गडकरी यांनी माहिती दिली.

Webtitle : nitin gadakari on sharad pawar and rain

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadakari on sharad pawar and rain