Nitin Gadkari
esakal
मुंबई : आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान आणि संशोधन महत्वाचे आहेत. पदवी घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींनी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अर्थार्जनी करत समाज आणि देशउभारणीसाठी योगदानही द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.