वीजग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेली वीजबिले भरावी लागतील, सवलतीची आशा मावळली

सुमित बागुल
Tuesday, 17 November 2020

महाराष्ट्र राज्यात वीजबिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलांबाबत सवलतीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊन काळात घरोघरी किंवा प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाणे शक्य नसल्याने सरासरीप्रमाणे वीजबिले पाठवण्यात आलेली. एकीकडे पगारात झालेली कपात किंवा गेलेली नोकरी आणि भरमसाठ वीजबिले यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलाच त्रस्त झालेला. अशात आशेचा किरण होता तो भरमसाठ वीजबिलांमध्ये अपेक्षित अशी कपात. मात्र, आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाची बातमी : 'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

गेल्या अनेक दिवसांपासून वीजबिल सवलतींबाबत अनेक बातम्या समोर येतायत. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये याबाबत चर्चा होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसं काहीही होताना पाहायला मिळालं नाही. भाजप कडून तसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याबाबत आंदोलने देखील केली गेलीत. मात्र सर्वसामान्यांना लॉकडाऊनमध्ये आलेली वीजबिले आता भरावीच लागणार आहेत.

महत्त्वाची बातमी : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

काय म्हणालेत ऊर्जामंत्री नितीन राऊत  : 

महाराष्ट्र राज्यात वीजबिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे. मात्र केंद्र सरकारकडून मदत केली गेली नाही तर तुर्तास वीजबिलांमध्ये सवलत मिळेल असे वाटत नाही. महावितरणकडून 24 तास वीज उपलब्ध केली गेली. त्यामुळे लोकांनी वीज वापरली आहे त्याचे बिल त्यांनी भरावं. कुणाचंही वीज कनेक्शन कट होणार नाही. मात्र कुणाला कुणाला योग्य बिले येत नाहीत असं वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या मीटरबाबत तक्रार करावी आणि त्यांच्या मीटरची पाहणी केली जाईल असेही राऊत यांनी म्हंटले आहे.

nitin raut says electricity users will have to pay bills received during lockdown

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin raut says electricity users will have to pay bills received during lockdown