नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गणेश नाईक आणि अनुषंगाने भाजपसाठी अत्यंत कठीण होणार अशी चिन्ह आहेत. अजित पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला पुन्हा महाविकास आघाडीकडे आणण्याचा विडा उचलला आहे, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी मुंबई परत मिळवण्यासाठी आता कंबर कसलीये. शरद पवारांनी यासंदर्भातील जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. शरद पवार यांनी जबाबाबदरी सोपवल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांनी एकेक पावलं टाकायला सुरवात झालीये.

भाजपचे आजी माजी नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबतची माहिती शशिकांत शिंदे यांनी देत नवी मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ माजवून दिली आहे. यामध्ये 4 विद्यमान तर 5 माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचा गौपस्फोट शशिकांत शिंदे यांनी केलाय. "आता भाजपला उतरती कळा लागली आहे, दरम्यान ही लढाई कुणा एका व्यक्तीची नाही", असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलाय.  "चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्र गंभीरपणे घेतो का? महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांना ओळखतो का ?", आशा शब्दात त्यांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा मेळावा घेतला होता. या निवडणुकांमध्ये कुणाची एकाधिकारशाही खपवून घ्यायची नाही, असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.  "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी", असं देखील अजित पवार म्हणाले होते. आता होणाऱ्या निवडणुकाध्ये महापौर निवड होईल, स्थायी समिती अध्यक्ष निवड होईल, कुणी सभापती देखील होईल मात्र, नाईक घरातील कुणीच यापैकी काही होणार नाही म्हणत अजित पवार यांनी गणेश नाईक आणि भाजपला ओपन चॅलेंज दिलंय. 

nmmc electinos sharad pawar actively doing political moves to win navi mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com