नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

खारघर : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) येणाऱ्या पनवेल आणि उरण तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त 23 गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या बांधकामावर सिडको कारवाई करणारी नाही, अशी ग्वाही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी दिली. "नैनो'तील शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात सोमवारी (ता.26) सिडको मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी ही ग्वाही देण्यात आली. 

खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर, प्रकल्पग्रस्त समिती अध्यक्ष बबन पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, आर. सी. घरत, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, एकनाथ म्हात्रे, राकेश गोवारी आदी उपस्थित होते. 
शेतकऱ्यांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामावर सिडको कारवाई करते, हा प्रश्‍न मान्यवरांनी मुखर्जी यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. 

विकासानंतरच कर आकारणी 
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्तितीत झालेल्या बैठकीत सिडकोकडून नैना परिसराचा विकास झाल्यावरच कर आकारणी करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी मुखर्जी यांनी हा प्रश्‍न शासनाच्या नगरविकास विभागाअंतर्गत असल्यामुळे शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेतले जाईल, असे सांगितले. खासदार बारणे यांनी "सकाळ'ला सांगितले की, नैना प्रकल्प विकसित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची सिडकोने काळजी घ्यावी. 
 
--------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com