esakal | ए आई... मुलांची आईला आकांताने हाक पण लॉकडाऊनने केली ताटातूट, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

वडिलांच्या मृत्यूमुळे झालेले दुःख विसरून त्या मुलाच्या ओढीने महाराष्ट्रात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रवासी वाहतूक बंद आहे.

ए आई... मुलांची आईला आकांताने हाक पण लॉकडाऊनने केली ताटातूट, वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पनवेल : वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी राजस्थानातील उदयपूर येथे गेलेली महिला लॉकडाऊनमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे पनवेलमधील कळंबोली येथे राहणारा आदित्य हा 6 वर्षीय लहानगा आईच्या विरहाने कासावीस झाला आहे. 

नक्की वाचा : “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं, की हा ‘लॉकडाउन लूक" आहे ?”

कळंबोली येथे राहणारे राहुल चव्हाण यांच्या पत्नी प्रीती यांच्या वडिलांचे राजस्थानातील उदयपूर येथे 9 मार्च रोजी निधन झाले. चव्हाण यांना दोन मुले असून, पहिला मुलगा सचिन 11 वर्षांचा, तर दुसरा मुलगा आदित्य 6 वर्षांचा आहे. शाळेत शिकणाऱ्या या मुलांच्या शालेय परीक्षा तोंडावर असल्याने प्रीती यांनी मुलांना कळंबोली येथेच ठेवून उदयपूरला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या. याचदरम्यान लॉकडाऊनची घोषणा झाल्याने आणि प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने 50 दिवसांपासून माय लेकरांची ताटातूट झाली आहे. 

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा, 172 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा करणार सत्ता स्थापनेचा दावा?

भेटीसाठी प्रशासनाला विनवण्या
वडिलांच्या मृत्यूमुळे झालेले दुःख विसरून त्या मुलाच्या ओढीने महाराष्ट्रात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे मुलाला भेटण्यासाठी प्रवास करता यावा, यासाठी त्या प्रशासनाकडे विनवण्या करत आहे.  दरम्यान, आई आणि मुलाची भेट घडवून आणण्यासाठी उदयपूरला जाण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी राहुल चव्हाण यांनी केली आहे.

Lockdown, mother is in Rajasthan, while the 6-year-old son is in Maharashtra