esakal | आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारसह तक्रारदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणात आता उद्या सुनावणी होणार आहे.

महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई

गोस्वामी यांना काल अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याविरोधात त्यांनी याचिका केली असून कारवाई रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. न्या एस एस  शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकेत तक्रारदार अक्षता नाईक आणि राज्य सरकारची बाजू ऐकायला हवी, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारसह पोलिस आणि तक्रारदार नाईक यांना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

सन 2019 मध्ये पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाबाबत ए समरी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे प्रकरण बंद झाले असून त्याला पोलिस किंवा तक्रारदाराने आव्हान दिले नाही. तसेच कालची कारवाई न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी  केली आहे, त्यामुळे ती अवैध आहे, हा व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असा युक्तिवाद गोस्वामी यांच्या वतीने करण्यात आला. सुनावणी होईपर्यंत जामीन मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली असून सर्व पक्षकारांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले.

( संपादन - सुमित बागुल )

no bail to arnab goswami mumbai high court adjourned case proceedings till tomorrow

loading image
go to top