मुंबईत 'बर्ड फ्लू'चा अलर्ट नाही, प्रादुर्भाव झाल्यास महापालिका सज्ज

bird flu
bird flusakal media

मुंबई : पक्षांद्वारे माणसांमध्ये आणि माणसांद्वारे पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग (bird flue) होणे तितकेचे सहज नाही. दिल्लीत (delhi) सापडलेल्या बर्ड फ्लूच्या रुग्णामुळे (bird flue patient) धसका घेत सर्वच राज्यांना अलर्ट (State alert) देण्यात आला होता. मात्र, मुंबई महापालिकेला (BMC) बर्ड फ्लू संदर्भात कोणताही अलर्ट नसून मुंबईत सध्या एकही रुग्ण सापडला नसल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ( no bird flue patient found in Mumbai no alert in mumbai-nss91)

तसेच, बर्डफ्लु आजाराचा प्रादुर्भाव मुंबईत झालाच तर पुढील नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, बर्डफ्लु हा आजार प्रथमतः पक्ष्यांमध्ये उद्भवतो आणि त्यानंतर अत्यंत कमी प्रमाणात मनुष्यामध्ये प्रसार होण्याची संभावना असते. यास्तव या आजाराचा पक्ष्यांमध्ये उद्भव झाला तर पक्षु संवर्धन विभागामार्फत तसे जाहीर करण्यात येते आणि त्याबाबत कार्यवाही देखील पशुसंवर्धन विभागामार्फतच राबवली जाते.

bird flu
ICICI बँकेत दरोडा! महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यू; आरोपीला अटक

मुंबईमध्ये बर्ड फ्लूची साथ पक्ष्यांमध्ये उद्भवलेली नाही. बर्डफ्लु आजाराचा प्रादुर्भाव झालाच तर नियंत्रणासाठी महानगरपालिका आरोग्य विभाग सज्ज आहे. पालिकेकडून नागरिकांमध्ये प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक जनजागृती केली जाते.

या आहेत उपाययोजना

पालिकेच्या सुचनांनुसार, मांस आणि अंडी पुर्ण शिजवून खावे. पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात साबणाने वांरवार धुवावे, व्यक्तीगत स्वच्छता राखावी, तसेच मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा.

मृत पक्षांशी संपर्क टाळावा.

एखाद्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास याबाबत माहिती आपातकालीन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर देण्याबाबत नागरिकांना सुचना केल्या गेल्या आहेत.

जनजागृती विषयक भित्ति पत्रके, हँड बिल, पोस्टर यांचे वितरण पोल्ट्री चिकन / मटन दुकानदार तसेच या व्यवसायाशी सलग्न असणारे व्यावसायिक, बाजारपेठा येथे केले  जाते.

bird flu
म्हाडाचे ८० भूखंड जाणार महापालिकेच्या ताब्यात, राजकीय वादांवर पडदा

रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना

मुंबईमध्ये बर्डफ्लुचीसाथ आलेली नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. साथ नसली तरीही आवश्यकता पडल्यास बर्डफ्लु आजाराच्या तपासणीसाठी चाचणी नमूना पुणे येथील एन आयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्याची सोय देखील उपलब्ध असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी साांगितले.

संक्रमित जागांच्या संपर्कात येणे टाळावे

पॉल्ट्रीच्या पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक संशयित जागेला स्वच्छ करून ती संसर्गमुक्त करणे अत्यंत आवश्यक असते. स्वत:ला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वच साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. ग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे. जर एखाद्या भागात पक्षांचा मृत्यू होत असेल, तर आसपासच्या लोकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. मृत पक्षांच्या जवळ जाऊ नये आणि तत्काळ ही माहिती संबंधित विभागाला कळवावी.

बर्ड फ्लूची लक्षणे

एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यास त्याला छोट्या आजारांपासून गंभीर आजारही होऊ शकतात. ताप, खोकला, गळा कोरडा होणे, नाक वाहणे, मांसपेशींमध्ये वेदना, अस्वस्थता, डोकेदुखी, डोळे लाल होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी बर्ड फ्लूची लक्षणे दिसू शकतात. गर्भवती महिला, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे आणि 65 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com