मिठी नदीच्या शुद्धीकरणासाठी सल्लागार नाही, निविदांना मुदत वाढ

समीर सुर्वे
Monday, 26 October 2020

मिठी नदीच्या शुध्दीकरणा बरोबरच पुरनियंत्रणासाठी महानगर पालिका जुलै महिन्यापासून सल्लागार नियुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यात सल्लागार न सापडल्याने आता पुन्हा निवीदांना मुदत वाढ देण्यात आली आहे.

मुंबई: मिठी नदीच्या शुध्दीकरणा बरोबरच पुरनियंत्रणासाठी महानगर पालिका जुलै महिन्यापासून सल्लागार नियुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यात सल्लागार न सापडल्याने आता पुन्हा निवीदांना मुदत वाढ देण्यात आली आहे.

मिठी नदीत येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवणे, नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करणे तसेच नदीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागार नेमण्याची प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरु झाली आहे. मात्र,अद्याप पालिकेला त्यात यश आले नाही. जुलै महिन्यात सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया संपणार होती. मात्र,ऑक्टोबर पर्यंत निवीदा प्रक्रियांना प्रतिसाद न मिळाल्याने आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मिठी नदीमुळे कुर्लासह शिव, चुनाभट्टी या भागात पाणी साचते. शिव येथे पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूकच ठप्प पडते. त्यामुळे मिठी नदीच्या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगर पालिका भुभिगत होल्डींग पॉंड बनवण्याचा विचार करत आहे. तसेच, या तळ्यात साचलेले पाणी माहूल खाडी पर्यंत वाहून आणणे किंवा पावसाचा जोर ओसरल्यावर प्रक्रिया करुन नदीत सोडणे अशा दोन पर्यायांचा विचार पालिका करत आहे. तसेच,या पाण्यावर प्रक्रिया करुन त्यांचा पिण्या व्यतिरीक्त वापरासाठीही विचार करता येऊ शकतो. अशा तीन पर्यांयाचा अभ्यास करुन त्यावर अहवाल तयार करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने मिठी नदीचा विकास कसा करता येईल याबाबतही सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा-  निर्देश नसताना शाळांकडून परीक्षेचे आयोजन, परीक्षा घेणाऱ्या शाळांच्या मुख्यध्यापकांवर होणार कारवाई

मिठीवर फ्लड गेट

समुद्राला भरती असताना पाणी थेट कुर्ला पर्यंत मिठी नदीत येते. याच काळात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होत नसल्याने कुर्लासह शिव चुनाभट्टी परीसरात पाणी साचते. यावर उपाय म्हणून माहिम कॉंजवे अथवा ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी फ्लड गेट अथवा धरण बांधून भरतीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच नदीतील पाणी उच्च क्षमतेच्या पंम्प सहाय्याने  समुद्रात सोडता येईल.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

No consultant Mithi river purification extension of tenders


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No consultant Mithi river purification extension of tenders