मुंबईची माणुसकी! लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिला अल्पोपहार

रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांचं कौतुकास्पद पाऊल
दादर रेल्वे स्थानकात थांबलेल्या लोकल मधील प्रवाशांना मदत करतांना रेल्वे कॅटरिंग कर्मचारी
दादर रेल्वे स्थानकात थांबलेल्या लोकल मधील प्रवाशांना मदत करतांना रेल्वे कॅटरिंग कर्मचारी

शिवडी - मुंबईवर जेव्हा कधी संकट येते, तेव्हा माणुसकीचे दर्शन घडते. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असो किंवा मुसळधार पावसामुळे (mumbai rain) ठप्प झालेली मुंबई. गरज असताना रक्तदान करण्यासाठी मुंबईकर कधीही मागे राहत नाहीत तसेच मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाल्यानंतर लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुद्धा तितकीच आपुलकीने मदत करतात. (Heavy rain in mumbai railway catering employee provide food packet to people who stranded in train)

आज मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले होते. परिणामी रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावरवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवासी बुधवारी तासंतास लोकलमध्येच अडकून पडले होते. लोकलमध्ये त्यांची स्थिती काय असेल, याचा विचार करुन रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांनी एक चांगले पाऊल उचलले.

दादर रेल्वे स्थानकात थांबलेल्या लोकल मधील प्रवाशांना मदत करतांना रेल्वे कॅटरिंग कर्मचारी
मुंबईकरांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMDचा इशारा

रेल्वे स्थानकातील रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात दिला. प्रत्येक स्थानकात प्रवाशांना अल्पोपहार व पाणी वाटप करीत मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com