यंदा सणासुदीत वाहन खरेदीसाठी ‘नो डिस्काऊंट’?

मागणीत वाढ; मात्र उत्पादन घटल्याने विक्रेत्यांना चिंता
यंदा सणासुदीत वाहन खरेदीसाठी ‘नो डिस्काऊंट’?

मुंबई : कोरोना लाट ओसरल्याने देशात चार चाकी प्रवासी वाहनांची मागणी वाढलेली असतानाच उत्पादनात मात्र अजूनही तूट असल्याने यंदा प्रथमच सणासुदीला मोटारींवर फारसे डिस्काऊंट किंवा ऑफर नसतील, अशी भीती वाहन विक्रेत्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनतर्फे (फाडा) ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांचे उत्पादन कमी केले आहे; मात्र सणासुदीच्या हंगामात वाहनांची मागणी जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी या कालावधीत मागणी जास्त व पुरवठा कमी अशी अवस्था येऊ शकते. त्यामुळे वाहन उत्पादक तसेच विक्रेतेही मोटारींच्या किमतीवर फारसे डिस्काऊंट वा अन्य सवलती देणार नाहीत, अशी शक्यता ‘फाडा’ने व्यक्त केली आहे.

यंदा सणासुदीत वाहन खरेदीसाठी ‘नो डिस्काऊंट’?
आरटीओ पदासाठी पदोन्नती रखडणार?उपप्रादेशिक अधिकारी ईडीच्या रडारवर

गेल्या दोन वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील वाहनविक्रीची तुलना केल्यास फक्त ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे; तर रिक्षा, टेम्पो-ट्रक आदींच्या विक्रीत घट झाली आहे. आता कोरोनाचे सावट कमी होत असल्याने सणासुदीच्या दिवसांत वाहनांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे; मात्र कमी पुरवठा ही चिंतेची बाब असल्याचे फाडाचे म्हणणे आहे.

मोटारींची विक्री दोन वर्षांपूर्वीच्या एक लाख ९२ हजारांच्या तुलनेत या वर्षी ३१ टक्के वाढून दोन लाख ५३ हजारांवर गेली आहे. ट्रॅक्टरची विक्रीही दोन वर्षांपूर्वीच्या ५२ हजारांवरून ७१ हजारांपर्यंत गेली आहे. २०१९ मध्ये एकूण सर्व वाहनांची विक्री १६ लाख २४ हजार, २०२० मध्ये १२ लाख नऊ हजार व २०२१ मध्ये १३ लाख ८४ हजार अशी आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री गेल्या वर्षीपेक्षा वाढली असली, तरी अजूनही ती कोविडपूर्व काळातील विक्रीच्या बरोबरीला आली नाही.

यंदा सणासुदीत वाहन खरेदीसाठी ‘नो डिस्काऊंट’?
मुंबईत तिसरी लाट येणार नव्हे आधीच आलीये: महापौर

दुचाकी विक्रीला फटका

दुचाकीची क्रेझ सर्वांना आहे; मात्र त्यांच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाच्या दरातील वाढ व दीड वर्षे महाविद्यालये बंद असल्याचा परिणाम म्हणून अजूनही तरुण मंडळी दुचाकींच्या खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या (नऊ लाख १५ हजार) तुलनेत या वर्षी दुचाकीच्या विक्रीत (९ लाख ७६ हजार) साडेसहा टक्क्यांहून जास्त वाढ दिसत असली, तरी कोविडपूर्व म्हणजे ऑगस्ट २०१९ च्या विक्रीचा (१२ लाख ६१ हजार) विचार केल्यास यंदाच्या विक्रीत २२.६२ टक्के घट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com