आरटीओ पदासाठी पदोन्नती रखडणार?उपप्रादेशिक अधिकारी ईडीच्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTO

आरटीओ पदासाठी पदोन्नती रखडणार?उपप्रादेशिक अधिकारी ईडीच्या रडारवर

मुंबई : परिवहन विभागातील पदोन्नती (RTO promotions) आणि बदल्यांच्या (transfers) प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) आणि त्यांच्या जवळचे नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे (bajrang kharmate) यांची ईडीकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 8 उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून होणाऱ्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ३५३ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

नुकताच ईडीने खरमाटे यांना समन्स पाठवला होता. त्यावरून खरमाटे आपल्या वकीलासह ईडीच्या कार्यालयात हजर झाल्याचे दिसून आले, त्यानंतरही खरमाटे यांची चौकशी काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. ईडीच्या चौकशीपूर्वी परिवहन विभागातील बदल्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान परिवहन विभागातील 8 पदावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती होणार होती. त्यामध्ये बजरंग खरमाटे यांची सुद्धा पदोन्नती होणार होती. मात्र, परिवहन विभागातील भ्रष्टाचारासंदर्भातील जुन्या आरोपावरून खरमाटे यांना ईडीने चौकशीच्या घेऱ्यात घेतल्याने आता परिवहन विभागातील आरटीओ पदाच्या पदोन्नती रखडण्याची शक्यता आहे.

Web Title: Rto Promotions Anil Parab Bajrang Kharmate Enforcement Directorate Investigation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..